(दापोली)
ज्ञानदीप विद्यामंदिर, दापोलीच्या विद्यार्थिनींनी नुकत्याच झालेल्या जिल्हास्तरीय मल्लखांब स्पर्धेत उत्तम कामगिरी केल्याने कोल्हापूर विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
इयत्ता ७ वीतील कु. स्वरा संतोष परब हिने १४ वर्षांखालील गटात प्रथम क्रमांक, तर कु. दिक्षा वैभव चव्हाण हिने चौथा क्रमांक मिळवला. त्यांच्या या यशामुळे त्या दोघींची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या यशस्वी विद्यार्थिनींना संस्था अध्यक्षा सरोज मेहता, सेक्रेटरी सुजय मेहता, सुयोग मेहता, सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापक मधुकर मोरे, क्रीडा विभाग प्रमुख व्ही. डी. पाटील तसेच मार्गदर्शक क्रीडा शिक्षक यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

