(दापोली)
दापोली तालुक्यातील आसूद गुरववाडी येथे ६ नोव्हेंबर रोजी एका २७ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. ललित विकास गुरव असे त्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विलास गुरव यांचे आसूद येथे नवीन घर बांधण्याचे काम सुरू असून ते पूर्णत्वास आले आहे, मात्र त्यावर अद्याप पत्रा टाकलेला नाही. विलास यांचा मुलगा ललित गुरव याला दारूचे व्यसन होते.
दारूच्या नशेत ललितने नवीन बांधकाम सुरू असलेल्या घराच्या किचनमधील पडवीतील लोखंडी अँगलला नायलॉन साडीने गळफास लावून घेतला. दुपारी २:३० ते ४:३० या वेळेत ही घटना घडली. घरातील सदस्यांनी त्याला तात्काळ उपजिल्हा रुग्णालय दापोली येथे रुग्णवाहिकेच्या सहाय्याने दाखल केले, परंतु डॉक्टरांनी त्याला तपासून मयत घोषित केले. या घटनेची नोंद दापोली पोलीस स्थानकात अकस्मित मृत्यू म्हणून करण्यात आली असून, दापोली पोलीस अधिक तपास करीत आहेत.

