( दापोली )
दापोली-खेड मार्गावर आज पहाटे साडेपाचच्या सुमारास अर्टिगा कारचा (गाडी क्रमांक MH46 CH 6056) अपघात झाल्याची घटना घडली. खेडकडून दापोलीकडे येत असताना टाळसुरे येथे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला घसरून अपघात झाला, अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे.
या कारमध्ये पाच प्रवासी प्रवास करत असल्याची माहिती असून सर्वांना किरकोळ दुखापत झाली असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. मात्र या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले आहे.
घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आले. अपघातामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला होता.
या प्रकरणी पोलिसांकडून अपघाताच्या नेमक्या कारणाचा तपास सुरू आहे.

