(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे येथील स्वयंभू श्रींच्या मंदिरात प्रतिवर्षाप्रमाणे रविवार दिनांक 24 ते गुरुवार दिनांक 28 ऑगस्ट पर्यंत भाद्रपदी गणेशोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमांमध्ये रविवार दिनांक 24 ऑगस्ट रोजी सकाळी साडेनऊ ते साडेअकरा पर्यंत श्रींची महापूजा व प्रसाद त्यानंतर रविवार दिनांक 24 ऑगस्ट ते गुरुवार दिनांक 28 ऑगस्टपर्यंत दररोज सायंकाळी सात ते साडेसात पर्यंत आरती व मंत्रपुष्प, सोमवार दिनांक 25 ऑगस्ट रोजी दुपारी 11 ते 12 पर्यंत सहस्त्र मोदक समर्पण, रविवार दिनांक 24 ते गुरुवार दिनांक 28 ऑगस्टपर्यंत दररोज सायंकाळी साडेसात ते साडेनऊ वाजेपर्यंत डोंबिवली मुंबई येथील प्रसिद्ध कीर्तनकार ह. भ. प. सौ.वेदश्री वैभव ओक यांचे सुश्राव्य कीर्तन त्यानंतर 27 ऑगस्ट रोजी गणपती मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गावर स्वयंभू श्रीं ची पालखी मिरवणूक अशा प्रकारे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
भाद्रपदी गणेशोत्सवानिमित्त गुरुवार 4 सप्टेंबर रोजी वामन जयंती निमित्त संस्थान श्री देव गणपतीपुळे यांचे वतीने दुपारी साडेअकरा ते दोन वाजेपर्यंत भाविक आणि समस्त स्थानिक ग्रामस्थांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्व कार्यक्रमांमध्ये भाविक व स्थानिक ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन संस्थान श्री देव गणपतीपुळे यांचे वतीने करण्यात आले आहे.

