(रत्नागिरी / प्रतिनिधी)
तालुक्यातील गावडे-आंबेरे मार्गावर दुचाकीवरील तोल जाऊन पडल्याने जखमी झालेल्या महिलेचा कोल्हापूर येथील सी.पी.आर. हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
मृत महिलेचे नाव सौ. मेघा टोलू डोर्लेकर (वय ५०, रा. मेर्वी, ता. जि. रत्नागिरी) असे आहे.
ही घटना ६ जुलै २०२५ रोजी दुपारी ३.३० वाजता घडली. मेघा डोर्लेकर या मोटारसायकलवरून प्रवास करत असताना गावडे-आंबेरे गावाजवळ त्यांच्या दुचाकीवरील तोल जाऊन त्या रस्त्यावर पडल्या. अपघातानंतर त्यांना तत्काळ रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांना पुढील उपचारांसाठी सी.पी.आर. हॉस्पिटल कोल्हापूर येथे हलवण्यात आले.
तेथे उपचार सुरू असतानाच दुर्दैवाने त्यांची प्राणज्योत मालवली.
या प्रकरणी अमृ. क्रमांक १५/२०२५ नोंदविण्यात आला असून, बी.एन.एस.एस. १९४ प्रमाणे पोलीस कारवाई करण्यात आली आहे. या घटनेची नोंद रत्नागिरी पुर्णगड पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.