(संगमेश्वर / एजाज पटेल)
संगमेश्वर तालुक्यातील कुरधुंडा गावच्या महात्मा गांधी तंटामुक्त अध्यक्षपदी धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते इरफान उस्मान नेवरेकर यांची उपस्थित सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. नवनिर्वाचित तंटामुक्त अध्यक्ष इरफान नेवरेकर यांचे सर्वस्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
कुरधुंडा ग्रामपंचायतची ग्रामसभा सरपंच नाझीमा बांगी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या वेळी इरफान नेवरेकर यांच्या सामाजिक व प्रशासनाचा गाढा अनुभव असलेल्या कार्याची दखल घेत सर्वपस्थितांकडून महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्षपदी निवड करण्यात आली. या वेळी उपसरपंच तैमूर अलजी, ग्रामसेविका भयजे,विलास मोहिते, मोहसीन अलजी, कामिल परदेसी, अली मालगुंडकर, अबीद अलजी, माजी सरपंच जमूरत अलजी, कैस मालगुंडकर,ग्रा. पं सदस्य मयुरी डावल, पोलीस पाटील नफिसा फकीर, नाजीम अलजी, अंगणवाडी सेविका तरन्नुम अलजी, मुनीर अलजी, शौकत अलजी, शब्बीर मालगुंडकर, साजिद नेवरेकर, इंतिखाब अलजी, अयुब अलजी, विजय जाधव, दीपक डावल आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी बोलताना इरफान नेवरेकर म्हणाले की, समाजकार्य आणि प्रशासकीय अनुभवाची दखल घेत माझ्यावर विश्वास ठेऊन माझी तंटामुक्त अध्यक्षपदी निवड करून माझ्यावर जी जबाबदारी सोपवली आहे, ती जबाबदारी पार पाडताना मी समिती सदस्य आणि ग्रामस्थ यांना विश्वासात घेऊन त्यांच्या सहकार्याने योग्य रीतीने पार पाडणार, गावातील तंटे गावच्या ठिकाणी मिठवण्यासाठी अधिक भर देणार तसेच गावात वादविवाद होऊ नये याकडे लक्ष देऊन गावात सलोखा ठेवण्याच्या दृष्टने प्रयत्नशील राहणार आहे.
कुरधुंडा गाव तंटामुक्त समिती अध्यक्षपदी इरफान नेवरेकर यांची निवड झाल्याचे समजताच सामाजिक, राजकीय, मित्र परिवार आदी सर्वस्तरातून त्यांना प्रत्यक्ष भेटून तसेच व्हाट्सऍप, फेसबुक, इन्स्ट्राग्राम आदी सोशल मीडियाद्वारे अभिनंदनचे संदेश पाठवून पुढील वाटचालीस शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

