(रत्नागिरी)
शहरातील छत्रपती नगर परिसरात धाडसी घरफोडीची घटना घडली आहे. चोरट्यांनी हसीना अन्वर काझी यांच्या बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करत तब्बल १५ तोळे सोने आणि ४० हजार रुपये रोख रक्कम असा मुद्देमाल लंपास केला आहे.
ही घटना आज (मंगळवारी) सकाळी उघडकीस आली. काझी यांच्या शेजाऱ्याने सकाळी साडेसातच्या सुमारास पाहिले असता दोन्ही बाजूंचे दरवाजे बाहेरून कडी लावून बंद असल्याचे आढळले. त्यानंतर संशय आल्याने परिसरातील नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, फॉरेन्सिक तज्ज्ञांची टीम देखील तपासासाठी आली असून, पोलिसांकडून पंचनामा आणि पुढील तपास सुरू आहे.
हसीना काझी यांच्या अनुपस्थितीचा फायदा घेत चोरट्यांनी ही घरफोडी केल्याची प्राथमिक शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

