(जाकादेवी / संतोष पवार)
रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढीची वार्षिक सर्वसाधारण सभा आज रत्नागिरी येथील बालाजी मंगल कार्यालय येथे उत्साहात संपन्न झाली. यावेळी पतपेढीच्या सभासदांना १५ % लाभांश देण्याचे घोषित करण्यात आले , शिवाय सभासदांच्या हितासाठी कल्याणकारी योजनाही ठरविण्यात आल्या. सभेच्या प्रारंभी पेहलगाम हल्ल्यांमध्ये मृत्युमुखी झालेल्या भारतीय नागरिकांनाव वर्षभरामध्ये भारतातील महान व्यक्ती निधन पावले, ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतीय सैन्य दलातील काही सैनिक कर्तव्य बजावत असताना शहीद झाले अशा सर्वांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. रत्नागिरी जिल्ह्यातील ज्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाले आहे अशा शिक्षकांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. सभासदांसाठी विविध कल्याणकारी योजना आणण्याचे धोरण यावर्षी पतपेढीने ठरवले आहे.
सभासदांना यावर्षी १५ टक्के डिव्हिडंट देण्यात येणार आहे. सोने तारण कर्ज योजना संदर्भात तरतुदी करण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे सर्व सभासदांसाठी आरोग्य विमा देण्याचा निर्णय देखील पतपेढीच्या वतीने घेण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी हे चांगल्या पद्धतीने काम करणारी संपूर्ण महाराष्ट्रातील एक अग्रगण्य पतपेढी आहे अशी प्रतिक्रिया पतपेढीचे चेअरमन संतोष कांबळे यांनी व्यक्त केली. पतपेढीच्या चांगल्या कामासाठी व प्रगतीसाठी पतपेढीचे विद्यमान संचालक आणि सर्व संघटनांचे पदाधिकारी यांनी चांगल्या पद्धतीने योगदान दिले असल्याची प्रतिक्रिया चेअरमन संतोष कांबळे यांनी दिली.
आजच्या या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये चेअरमन संतोष कांबळे, व्हॉइस चेअरमन अरविंद पालकर, संचालक मनेष शिंदे, अशोक मळेकर, राजेंद्र चंदिवडे, अमोल भोबस्कर, रमेश गोताड, चंद्रकांत कोकरे, संजय डांगे, विजय खांडेकर, सुनील दळवी, चंद्रकांत झगडे, श्रीम. गुलजार डोंगरकर, श्रीम. प्रांजली धामापूरकर, संतोष कदम, अंकुश चांगण, तज्ज्ञ संचालक सुरेंद्र रणसे, शशिकांत सकपाळ, कार्यकारी संचालक हरेश देसाई आदींसह सर्व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो – रत्नागिरी येथे पतपेढी सभासदांना मार्गदर्शन
करताना चेअरमन संतोष कांबळे व सोबत पतपेढी संचालक व पदाधिकारी

