(रत्नागिरी / वार्ताहर)
रत्नागिरीतील होंडा मोटारसायकल अँड स्कूटर इंडिया लिमिटेडचे अधिकृत डीलर जागृत होंडा यांना एक्सटेंडेड वॉरंटी (EW) विभागात उत्कृष्ट कामगिरीबद्दल महाराष्ट्रातील टॉप-५ डीलर्समध्ये स्थान मिळाल्याने कंपनीतर्फे विशेष सन्मान करण्यात आला. या गौरवप्रसंगी होंडा मोटारसायकल अँड स्कूटर इंडिया लिमिटेडचे रिजन हेड भूषण देवरे यांच्या हस्ते जागृत होंडाचे व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र जोशी आणि रेश्मा जोशी यांना सन्मानचिन्ह प्रदान करून गौरविण्यात आले.
यावेळी बोलताना राजेंद्र जोशी यांनी सांगितले की, “जागृत होंडाला मिळालेला हा सन्मान ग्राहकांनी दाखविलेल्या विश्वासामुळेच शक्य झाला आहे. हा पुरस्कार केवळ आमचा नसून जागृत होंडाच्या प्रत्येक कर्मचारी, ग्राहक आणि संपूर्ण जागृत परिवाराचा आहे. भविष्यातही ग्राहकांना अधिक दर्जेदार आणि विश्वासार्ह सेवा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू.”
व्यवस्थापकीय संचालक रेश्मा जोशी यांनीही सर्व ग्राहक आणि कर्मचाऱ्यांचे आभार मानत सांगितले की, “ग्राहकांच्या विश्वासामुळे अल्पावधीतच जागृत होंडाने राज्यस्तरावर वेगळी ओळख निर्माण केली आहे. आगामी काळात विक्री आणि सर्व्हिस विभागात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ग्राहकांना अधिक जलद, दर्जेदार आणि समाधानकारक सेवा देण्याचा आमचा प्रयत्न असेल.”
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सर्व्हिस मॅनेजर निखिल चौगुले यांनी केले, तर सेल्स मॅनेजर अमित शिरधनकर यांनी उपस्थित ग्राहक आणि मान्यवरांचे आभार मानले.
या सन्मान सोहळ्याला जागृत होंडाचे अधिकारी, कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने ग्राहक उपस्थित होते. महाराष्ट्रातील टॉप-५ डीलर्समध्ये स्थान मिळाल्याने जागृत होंडाच्या कामगिरीबद्दल ग्राहक आणि व्यावसायिक क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

