(रत्नागिरी)
मिऱ्या बंदरातील योमन मरिन कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा कामाच्या ठिकाणी छातीत दुखू लागल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाला. नामदेव गणपत बारगुडे (वय ५२, मुळ गाव-साठरे बांबर, ठोबरेवाडी, पाली, जि. रत्नागिरी, सध्या राहणार मिर्या बंदर) असे मृताचे नाव आहे.
बारगुडे हे दि. १० ऑगस्ट रोजी दुपारी दोनच्या सुमारास कंपनीत काम करत असताना छातीत वेदना जाणवू लागल्या. सहकाऱ्यांनी त्यांना तातडीने सिव्हिल हॉस्पिटल, रत्नागिरी येथे दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना घरी नेण्यात आले; मात्र प्रकृतीत सुधारणा झाली नाही. रात्री नऊच्या सुमारास पुन्हा छातीचा त्रास वाढल्याने त्यांना खाजगी वाहनाने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी रत्नागिरी पोलीस ठाण्यात अमृ. क्रमांक ८१/२०२५, बीएनएसएस १९४ प्रमाणे नोंद करण्यात आली आहे.

