(मुंबई)
हज २०२६ साठी ऑनलाइन अर्ज भरण्याची अंतिम तारीख ७ ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली आहे. दिल्ली राज्य हज समितीच्या अध्यक्षा कौसर जहाँ यांनी सांगितले की, हज अर्जदारांकडून सातत्याने येणाऱ्या विनंत्या आणि विविध राज्य हज समित्यांकडून आलेल्या अनुरोधांच्या पार्श्वभूमीवर ही मुदत वाढविण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. त्यामुळे, ज्या इच्छुकांनी काही कारणास्तव अद्याप अर्ज सादर केलेला नाही, त्यांना आता या मुदतवाढीचा लाभ घेण्याची संधी मिळणार आहे.
दिल्ली राज्य हज समितीच्या “हज मंझिल” कार्यालयात अर्ज भरण्याची सुविधा पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार असून, इच्छुक अर्जदारांनी लवकरात लवकर आपले फॉर्म सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
आतापर्यंत दिल्ली राज्य हज समितीकडे एकूण ३,८९२ हज अर्ज प्राप्त झाले असून, यामध्ये ५५६ अल्पकालीन हजसाठी, २५६ अर्ज ६५ वर्षे आणि त्यावरील विशेष श्रेणीतील, १७ अर्ज मेहरम नसलेल्या महिलांचे, तर ३,६१९ अर्ज सामान्य श्रेणीतील आहेत.