(मुंबई / सुरेश सप्रे)
9 वी अखिल भारतीय रोलर स्केटिंग स्पर्धेत महाराष्ट्राचा युवा खेळाडू भांडूपच्या रेयांश पराग बने याने तीन सुवर्ण पदक पटकावत आपला ठसा उमटवत महाराष्ट्राची शान वाढवली आहे. ही स्पर्धा कलकत्ता रवींद्र सरोवर लेक येथे 19 जून ते 23 जून दरम्यान आयोजित करण्यात आली होती.
या स्पर्धा road lap, 100 m road, 500 m road अशा तीन टप्प्यात आयोजित करण्यात आली होती. या तीन ही प्रकारात कु.रेयांश पृथा पराग बने याने (8 -10) वयोगटातून महाराष्ट्राचे नेतृत्व केले. या राष्ट्रीय मानांकन स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघातून रेयांश बने याची निवड झाली होती.
या अखिल भारतीय रोलर स्केटिंग स्पर्धेत कु. रेयांश पृथा पराग बने याने (road1 lap) स्पर्धेत 1 सुवर्णपदक, (100mtr road) स्पर्धेत 1 सुवर्णपदक तसेच (500mtr road) स्पर्धेत 1 सुवर्णपदक अशी एकूण तीन सुवर्णपदके मिळवून सुवर्णपदकाची हॅट्रिक करून महाराष्ट्राची तसेच भारताची मान उंचावली आहे.
कु. रेयांश ने आतापर्यंत गोवा, म्हैसूर, केरळ आणि कलकत्ता येथे चार वेळा महाराष्ट्राचे रोलर स्केटिंगसाठी नेतृत्व केले आहे. कु. रेयांश हा महाराष्ट्रीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळकृष्ण बने, तसेच सचिव माजी आमदार डॉ. सुभाष बने यांचा नातू असून नऊ वर्षांचा कु.रेयांश बने हा युरो स्कूल, ऐरोली, ठाणे या शाळेचा विद्यार्थी आहे.
वयाच्या पाचव्या वर्षी त्याने महाराष्ट्रातील बेळगाव येथे सतत ९६ तास स्केटिंग करून आपले नाव गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवले आहे. त्याने आतापर्यंत विविध स्केटिंग स्पर्धांमध्ये 33 सुवर्ण 12 रौप्य आणि 8 कांस्य पदके पटकावली आहेत. कू. रेयांश पृथा पराग बने हा शिवसेना भांडूपचे युवानेते पराग बने आणि पराग इंग्लिश स्कूल भांडुप या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. पृथा पराग बने यांचा चिरंजीव आहे.
त्याच्या सुवर्ण कामगिरीबद्दल त्याचे महाराष्ट्रातील विविध थरातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. उद्या दि. २४रोजी पहाटे पाच वाजता छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर आगमन होताच त्याचे महाराष्ट्र राज्य स्केटिंग संघटना व महाराष्ट्रीय शिक्षण संस्था भांडूप याचे वतीने भव्य मिरवणूकीने स्वागत करण्यात येणार आहे.