( मुंबई )
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची नवी कार्यकारिणी अखेर जाहीर करण्यात आली आहे. नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाला संघटनात्मक बळ देण्यासाठी पक्षाने एक मजबूत कार्यकारिणी उभी केली आहे. कार्यकारिणीत ३६ जणांची राजकीय व्यवहार समिती, १६ वरिष्ठ उपाध्यक्ष, ३८ उपाध्यक्ष, ५ वरिष्ठ प्रवक्ते, १०८ सरचिटणीस, ९५ सचिव, आणि ८७ सदस्य अशा स्वरूपात मोठा सहभाग देण्यात आला आहे.
हर्षवर्धन सपकाळ यांनी सहा महिन्यांपूर्वी प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेतली होती. मात्र नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात दिरंगाई झाल्यामुळे पक्षांतर्गत चर्चा रंगल्या होत्या. अखेर मंगळवारी रात्री उशिरा कार्यकारिणीची यादी अधिकृतरीत्या प्रसिद्ध करण्यात आली. प्रदेश प्रभारी रमेश चेन्निथला यांच्या अध्यक्षतेखालील राजकीय व्यवहार समितीत अनेक ज्येष्ठ नेत्यांचा समावेश आहे. यामध्ये हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह मुकुल वासनिक, अविनाश पांडे, रजनी पाटील, माणिकराव ठाकरे, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले, खासदार वर्षा गायकवाड, सुनील केदार, नितीन राऊत, अमित देशमुख, नसीम खान यांसारख्या दिग्गज नेत्यांचा समावेश आहे.
पक्षाच्या आर्थिक व्यवस्थापनासाठी अभय छाजेड यांची कोषाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर वरिष्ठ उपाध्यक्षपदी अभिजित वंजारी, डॉ. प्रज्ञा सातव, सुनील देशमुख, कल्याण काळे, मोहन देशमुख, मुजफ्फर हुसेन, राजेंद्र मूळक, रणजीत कांबळे यांची निवड करण्यात आली आहे. उपाध्यक्ष म्हणून ३८ नेत्यांची निवड करण्यात आली असून, राज्यभरातील विविध भागांतून नेत्यांना संधी देण्यात आली आहे.
वरिष्ठ प्रवक्त्यांमध्ये अनंत गाडगीळ, सचिन सावंत, अतुल लोंढे, धीरज देशमुख आणि गोपाळ तिवारी यांचा समावेश आहे. श्रीनिवास बिक्कड यांच्याकडे माध्यम समन्वयक म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पक्षाच्या दिनदर्शिकेनुसार, पुढील निवडणूक तयारीसाठी माध्यम सुसंवादाचे महत्व लक्षात घेऊन ही नियुक्ती केली गेल्याचे मानले जाते. याशिवाय कार्यकारिणीमध्ये १०८ सरचिटणीस, ९५ सचिव आणि ८७ सदस्य यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही कार्यकारिणी आगामी काळात पक्षसंघटना बळकट करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे.
प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी १३ जिल्ह्यांसाठी नवीन जिल्हाध्यक्षांची घोषणाही केली आहे. यामध्ये पूनम पाटील (नवी मुंबई), साबीर शेख (धुळे शहर), प्रवीण चौरे (धुळे ग्रामीण), दीप चव्हाण (अहिल्यानगर), रणजीत देशमुख (सातारा), अभय साळुंखे (लातूर ग्रामीण), किरण पाटील डोणगावकर (संभाजीनगर ग्रामीण) यांचा समावेश आहे.
काँग्रेस नेते रमेश कीर, हुस्नबानू खलीपे प्रदेश सरचिटणीस