(पनवेल / तुषार पाचलकर)
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या, नवीन पनवेल मधील चांगू काना ठाकूर (सी.के.टी) विद्यालयाच्या मराठी माध्यमाच्या माध्यमिक विभागामध्ये संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त मुख्याध्यापक श्री कैलास सत्रे, पर्यवेक्षक श्री कैलास म्हात्रे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आज (मंगळवार दिनांक 23 सप्टेंबर) रोजी शालेय स्तरावर पालकांसाठी “पुष्पगुच्छ तयार करणे” या अनोख्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते
या कार्यक्रमासाठी शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष श्री तुषार पाचलकर, संघाच्या सहसचिव सौ स्नेहा जोशी तसेच सीकेटी ज्युनिअर कॉलेज प्राचार्य प्रशांत मोरे, प्राथमिक विभाग मुख्याध्यापक सुभाष मानकर, पूर्व प्राथमिक इंग्रजी माध्यम मुख्याध्यापिका सौ नीलिमा शिंदे, चांगू काना ठाकूर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री कैलास सत्रे, पर्यवेक्षक श्री कैलास म्हात्रे उपस्थित होते.
या स्पर्धेमुळे पालकांना आपली कलात्मकता, सर्जनशीलता व हतोटी सादर करण्याची संधी मिळाली. पालकांनी रंगीबेरंगी फुलांचा सुंदर वापर करून आकर्षक पुष्पगुच्छ साकारले. अनेकांनी नैसर्गिक फुलांना अभिनव कला कुसरीतून साज चढवून एकापेक्षा एक सरस रचना साकारल्या.
पुष्पगुच्छ स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमासाठी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे सदस्य श्री राहुल घरत तसेच श्री प्रतीक ठाकूर व नगरसेविका सौ वृषाली वाघमारे उपस्थित होत्या. सदर स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक श्रीमती दिपाली किशोर बुकम( ८वी ब), द्वितीय क्रमांक सौ उज्वला सचिन भिसे(७वी अ) तृतीय क्रमांक सौ सोनाली वासुदेव पालवे(८वी अ ) यांनी प्राप्त केला. या विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
स्पर्धेमध्ये पालकांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतल्याने शाळेच्या प्रांगणात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमातून शाळा, विद्यार्थी व पालक यांच्यातील नातेसंबंध अधिक दृढ होत असल्याचे मत व्यक्त करून या अनोख्या उपक्रमाचे कौतुक केले. संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर, व्हाईस चेअरमन वाय टी देशमुख, सचिव एस टी गडदे यांनी पालकांना पुष्पगुच्छ स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

