(गुहागर / रामदास गमरे)
आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ महिला कार्यकर्त्या, सामाजिक कार्यकर्त्या, तसेच संविधानाचे गाढे अभ्यासक, व्याख्याते, रिगल कॉलेज शृंगारतळी समितीचे अध्यक्ष महेंद्र श्रीधर कदम यांच्या मातोश्री नंदाबाई श्रीधर कदम मुक्काम गाव जामसूत, ता. गुहागर, जिल्हा रत्नागिरी यांचे वयाच्या ८३ व्या वर्षी नुकतेच अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
कालकथित नंदाबाई श्रीधर कदम या प्रेमळ, सुस्वभावी, मनमिळाऊ स्वभावाच्या ध्येयवादी व कर्तबगार आदर्श माता होत्या, रमाई महिला मंडळाच्या सल्लागार पदी त्यांनी कार्यभार ही सांभाळला होता त्यांच्या अंत्ययात्रेत तालुक्यातील, समाजातील सर्वच थरातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते, त्यांच्या अचानक जाण्याने समाजात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्यामागे चार मुले, सुना, तीन मुली, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
दिवंगत नंदाबाई श्रीधर कदम यांचा पुण्यानुमोदन व शोकसभेचा कार्यक्रम सोमवार दि. २८ जुलै २०२५ रोजी सकाळी १०:३० वाजता श्रीधर निवास, मु.पो. जामसूत (बौद्धवाडी) येथे बौद्धजन सहकारी संघ, ता. गुहागर शाखा क्र. ३८ (गाव – मुंबई) यांच्या अधिपत्याखाली स्थानिक शाखा अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली आहे. तरी विभागातील सर्व सभासद, कार्यकर्त्यांनी, विविध आंबेडकरी संघटना व त्यांच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून आदर्शांस श्रद्धांजली अर्पण करावी असे आवाहन शाखा क्र. ३८ (गाव – मुंबई)च्या वतीने काढण्यात आलेल्या परिपत्रकात केले आहे.

