(गुहागर)
दिशा महाराष्ट्राची आयोजित ४ थ्या वर्धापन दिनानिमित्ताने राज्यस्तरीय कवी संमेलन व राज्यस्तरीय सन्मान सोहळ्याचे आयोजन दि. २३ नोव्हेंबर २०२५ रोजी, सानपाडा, नवी मुंबई येथे करण्यात आले होते. गुहागर तालुक्यातील पाचेरी सडा गावातील नवोदित कवी व कलाप्रेमी विक्रांत तानाजी डिंगणकर यांची आदर्श कलारत्न पुरस्कारासाठी दखल घेण्यात आली.
लहानपणापासून कलेवरती अविरत प्रेम होत. वयाच्या बाराव्या वर्षापासून गावपातळीवरती होणाऱ्या नमनकलेमध्ये त्यांनी अनेक भूमिका साकारल्या आहेत. तसेच बळीवंश कलामंच रत्नागिरी यांच्या माध्यमातून मुंबईसारख्या रंगमंचावरती प्रदार्पण करत स्त्री भूमिका हि उत्तमरीत्या साकारली. त्याचप्रमाणे नाटकांमध्ये ही कार्यशील आहेत. तसेच ते उत्तम कवी सुद्धा आहेत.
त्यांच्या कविता सोशल मीडियावरती प्रकाशित आहेत. त्याचप्रमाणे नवाकाळ आदी वृत्तपत्रामध्ये त्यांच्या अनेक कविता प्रकाशित झाल्या आहेत. डॉ. टि. के. टोपे महाविद्यालयामध्ये सादर केलेल्या स्वरचित कवितेला प्रथम क्रमांकाने नामांकन सुद्धा मिळाले. तसेच त्यांनी स्वतः गीतबद्ध केलेली व स्वगायन केलेली दोन गाणी कुणबी कट्टा या युट्युब वाहिनी वरती प्रकाशित झाली आहेत.
त्यांच्या कलागुणांची दखल घेता मान्यवरांच्या उपस्थितीत दिशा महाराष्ट्राची यांच्यावतीने विक्रांत तानाजी डिंगणकर यांना “राज्यस्तरीय आदर्श कलारत्न पुरस्कार” प्रदान करण्यात आला.

