(मुंबई)
राज्य शासनाने गुरुवारी एक महत्त्वाचा निर्णय घेत २० आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. यामध्ये वरिष्ठ तसेच नव्याने आयएएस सेवेत नियुक्त झालेल्या अधिकाऱ्यांचा समावेश असून, विविध महत्त्वाच्या विभागांमध्ये नवी नियुक्ती करण्यात आली आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बदल्यांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
पर्यटन, समाज कल्याण, पालिका प्रशासन, भूअभिलेख, आदिवासी विकास अशा विविध क्षेत्रांत उच्चस्तरीय प्रशासकीय फेरबदल झाले असून, काही अधिकाऱ्यांची पदोन्नतीसह नवीन जबाबदारी देण्यात आली आहे.
प्रमुख बदल्या आणि नियुक्त्या खालीलप्रमाणे –
-
एम.एम. सूर्यवंशी (IAS:SCS:2010)
पूर्वीचे पद: व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, मुंबई
नवीन पद: आयुक्त, वसई-विरार महानगरपालिका, वसई -
दीपा मुधोल-मुंडे (IAS:RR:2011)
पूर्वीचे पद: अध्यक्षा व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल, पुणे
नवीन पद: आयुक्त, समाज कल्याण विभाग, पुणे -
नीलेश गटणे (IAS:SCS:2012)
पूर्वीचे पद: सीईओ, स्लम पुनर्वसन प्राधिकरण, पुणे
नवीन पद: व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, मुंबई -
ज्ञानेश्वर खिलारी (IAS:SCS:2013)
पूर्वीचे पद: संचालक, ओबीसी/बहुजन कल्याण, पुणे
नवीन पद: अतिरिक्त सत्तवसुली आयुक्त व संचालक, भूअभिलेख, पुणे -
अनिलकुमार पवार (IAS:SCS:2014)
पूर्वीचे पद: आयुक्त, वसई-विरार महानगरपालिका
नवीन पद: मुख्य कार्यकारी अधिकारी, एमएमआरएसआरए, ठाणे -
सतीशकुमार खडके (IAS:SCS:2014)
पूर्वीचे पद: संचालक, आपत्ती व्यवस्थापन, महसूल व वन विभाग, मंत्रालय
नवीन पद: सीईओ, स्लम पुनर्वसन प्राधिकरण, पुणे -
भालचंद्र चव्हाण (IAS:Non-SCS:2019)
पूर्वीचे पद: आयुक्त, ग्राउंड सर्व्हे डेव्हलपमेंट एजन्सी, पुणे
नवीन पद: संचालक, आपत्ती व्यवस्थापन, महसूल व वन विभाग, मंत्रालय -
सिद्धार्थ शुक्ला (IAS:RR:2023)
मागील आदेशात बदल –
नवीन पद: प्रकल्प अधिकारी, आयटीडीपी, धारणी व सहायक जिल्हाधिकारी, धारणी उपविभाग, अमरावती -
विजयसिंह देशमुख
पूर्वीचे पद: अति. जिल्हाधिकारी, संभाजीनगर विभाग
नवीन पद: व्यवस्थापकीय संचालक, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, मुंबई -
विजय भाकरे
पूर्वीचे पद: अध्यक्ष, जात वैधता समिती, भंडारा
नवीन पद: सदस्य सचिव, विदर्भ वैधानिक विकास मंडळ, नागपूर -
त्रिगुण कुलकर्णी
पूर्वीचे पद: अति. महासंचालक, एमईडीए, पुणे
नवीन पद: उपमहासंचालक, यशदा, पुणे -
गजानन पाटील
पद कायम: मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे -
पंकज देवरे
पूर्वीचे पद: अध्यक्ष, जात वैधता समिती, लातूर
नवीन पद: अध्यक्षा व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल, पुणे -
महेश पाटील
पूर्वीचे पद: अति. विभागीय आयुक्त (महसूल), पुणे विभाग
नवीन पद: आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे -
मंजिरी मनोळकर
पूर्वीचे पद: संयुक्त आयुक्त (पुनर्वसन), नाशिक विभाग
नवीन पद: व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य फार्मिंग कॉर्पोरेशन, पुणे -
आशा पठाण
पद कायम: संयुक्त सचिव, मुख्यमंत्री सचिवालय, नागपूर -
राजलक्ष्मी शहा
पूर्वीचे पद: अति. विभागीय आयुक्त (सामान्य), कोकण विभाग
नवीन पद: व्यवस्थापकीय संचालक, MAVIM, मुंबई -
सोनाली मुळे
पूर्वीचे पद: अध्यक्ष, जात वैधता समिती, अमरावती
नवीन पद: संचालक, ओबीसी/बहुजन कल्याण, पुणे -
गजेन्द्र बावणे
पूर्वीचे पद: अध्यक्ष, जात वैधता समिती, बुलढाणा
नवीन पद: आयुक्त, ग्राउंड सर्व्हे डेव्हलपमेंट एजन्सी, पुणे -
प्रतिभा इंगळे
पूर्वीचे पद: अध्यक्ष, जात वैधता समिती, सांगली
नवीन पद: आयुक्त, अल्पसंख्याक विकास, छत्रपती संभाजीनगर