(मुंबई)
डोंबिवलीत एका प्रसिद्ध ऑर्थोपेडिक डॉक्टर मयूरेश वारके यांच्यावर रुग्णाच्या पत्नीवर बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे. गुन्हा दाखल होताच डॉक्टर फरार झाले असून, मानपाडा पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
काय आहे घटना
मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या रुग्णाला गँग्रीन झाल्याने उपचारासाठी तो अंबरनाथमधील डॉक्टर मयूरेश वारके यांच्याकडे गेला. उपचारादरम्यान रुग्णाच्या पत्नीसोबत डॉक्टरांची ओळख झाली. दुर्दैवाने रुग्णाचे पाय कापले गेले आणि काही दिवसांनंतर त्याचा मृत्यू झाला.
पतीच्या निधनानंतर डॉक्टरांनी पीडित महिलेवर मानसिक आधार देण्याचे सांगत “मी तुझ्याशी लग्न करेन, तू काळजी करू नकोस” असे आमिष दाखवले. व या निमित्ताने जवळीक साधून गैरफायदा घेत, डॉक्टरांनी सातत्याने महिलेवर बलात्कार केला.
महिलेची तक्रार
डॉक्टर फक्त आपला फायदा उठवत आहे. लग्न करणार नाही, हे महिलेच्या लक्षात आल्यानंतर तिने तातडीने मानपाडा पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारावर पोलीसांनी डॉक्टर मयूरेश वारके यांच्यावर बलात्काराचा गुन्हा नोंदवला आहे.
गुन्हा दाखल होताच डॉक्टर फरार झाले आहेत. अंबरनाथमधील या प्रतिष्ठित डॉक्टरने रुग्णाच्या पत्नीवर झालेल्या आरोपांमुळे वैद्यकीय पेशालाही काळीमा फासली आहे. पोलीस सध्या या फरार आरोपीचा कसून शोध घेत आहेत.

