(मुंबई / रामदास गमरे)
“परित्राण पाठ म्हणजे संकटांपासून संरक्षण करणारा आणि जीवनात शांती व प्रज्ञा निर्माण करणारा अध्यात्मिक प्रवाह आहे. हे पाठ जीवन जगण्याची एक पवित्र कला आहे,” असे प्रतिपादन प्रवचनकार सुगंध कदम यांनी वर्षावास प्रवचन मालिकेच्या उद्घाटनप्रसंगी केले.
बौद्धजन सहकारी संघ, गुहागर व मुंबई शाखा, तसेच संस्कार समितीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वर्षावास प्रवचन मालिकेचा प्रारंभ रविवार, १३ जुलै रोजी नायगाव (मुंबई) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृहात झाला.
अध्यक्ष सुरेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमात प्रमुख विश्वस्त सिद्धार्थ पवार, विश्वस्त दीपक जाधव, विश्वस्त पांडुरंग गमरे, माजी मुख्य विश्वस्त संजय पवार, माजी विश्वस्त राजाभाऊ तथा रामदास धो. गमरे, कार्याध्यक्ष दीपक मोहिते, उपकार्याध्यक्ष अशोक कदम, सरचिटणीस संदेश गमरे, कोषाध्यक्ष प्रदीप कदम, सचिव संदेश जाधव, सुभाष मोहिते आदी मान्यवरांनी शुभेच्छापर विचार मांडले. विभाग अध्यक्ष संतोष पवार, किशोर जाधव, सचिन गमरे, संतोष कदम, संजीवनी यादव, धम्मवर्तन तांबे, संजय पवार, सर्व समितींचे प्रमुख, शाखांचे कार्यकर्ते आवर्जून उपस्थित होते.
कार्यक्रमात परित्राण पाठातील धार्मिक आणि तात्त्विक महत्त्व, संघाच्या आर्थिक स्वावलंबनासाठी सुरू झालेल्या पतसंस्थेचा प्रगतीचा आलेख, तसेच पुढील वर्षावास उपक्रमांची दिशा यावर विचारमंथन झाले.
पवारसाक्री शाखा क्र. २० तर्फे अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली. कार्यक्रमाची सांगता संदेश गमरे यांच्या आभार प्रदर्शनाने झाली.