( गुहागर )
गेल्या काही तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गुहागर तालुक्यातील पाचेरी आगर, बौद्धवाडी परिसरात दरड कोसळण्याची घटना घडली आहे. या दरडीमुळे मुख्य रस्ता पूर्णतः बंद झाला असून दोन्ही बाजूंनी वाहतूक ठप्प झाली आहे.
घटनेची माहिती मिळताच गुहागरचे तहसीलदार परिचित पाटील यांनी तात्काळ अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाठवले. दरड हटवून वाहतूक पूर्ववत सुरू करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित विभागाला दिले आहेत. प्रशासनाकडून तातडीने उपाययोजना सुरू करण्यात आल्या असून दरड हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

