(संगमेश्वर / प्रतिनिधी)
जिल्हा वार्षिक योजना सन २०२३-२४ अंतर्गत नागरी सुविधा योजनेतून ग्रामपंचायत तुरळसाठी प्राप्त झालेल्या नव्या घंटागाडीचे लोकार्पण रविवार, दिनांक १३ जुलै २०२५ रोजी ग्रामपंचायत कार्यालयात पार पडले. गावच्या स्वच्छतेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या या योजनेमुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
उद्घाटन सोहळ्याप्रसंगी ग्रामपंचायत सरपंच श्री. सहदेव सुवरे, उपसरपंच श्री. अनंत पाचकले, सदस्य श्री. रामचंद्र हारेकर, श्री. विनायक गुरव, तसेच रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक मा. श्री. राजेंद्रजी सुर्वे साहेब, पंचायत समितीचे मा. सभापती श्री. कृष्णाजी हरेकर साहेब, माजी सरपंच श्री. अरविंद जाधव साहेब, तंटामुक्ती अध्यक्ष श्री. संतोष जाधव साहेब, पोलीस पाटील श्री. संजय ओकटे, ग्रामस्थ श्री. सुरेश पवार, चंद्रकांत तुरळकर, नंदकुमार फडकले, मुकुंद गुरव, उदय मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते.
या नव्या घंटागाडीमुळे गावातील कचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी होण्यास मदत होणार असून, स्वच्छ भारत मिशनच्या उद्दिष्टपूर्तीकडे एक सकारात्मक पाऊल उचलण्यात आले आहे. गावात स्वच्छतेच्या दृष्टीने हा निर्णय ऐतिहासिक ठरणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

