(संगमेश्वर / प्रतिनिधी )
संगमेश्वर तालुक्यातील सांगवे केंद्रामधील जिल्हा परिषद शाळा कोसुम्ब रामवाडी ता. संगमेश्वर या शाळेतील इयत्ता तिसरी मध्ये शिकत असणारी कु. विधा संदिप वडके हिने मंथन परिक्षेमध्ये उत्तम यश संपादन केले आहे. तिच्या या उज्वल यशाबद्दल तिचे परिसरातून अभिनंदन केले जात आहे.
विधा हिने राज्य गुणवत्ता यादीत २५ वा, जिल्हा आणि विभागीय गुणवत्ता यादीत १८ वा आणि केंद्र गुणवत्ता यादीत दुसरा अस यश संपादन केले. विधा हि अत्यंत शिस्त बद्ध, वाचनाची आवड असणारी हुशार आणि होतकरु विद्यार्थीनी आहे. शालेय अभ्यासा बरोबरच बाह्य परीक्षांच्या अभ्यासाचे योग्य नियोजन करुन तीने हे उज्वल यश प्राप्त केले आहे. त्याचबरोबर बी डी एस परिक्षेमध्ये विधाने ८५% गुण मिळवून ब्रांझ पदक संपादन केले आहे. तिच्या या उल्लेखनीय यशा बद्दल विधाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. विधा हिला शिक्षक संजय बोडके, निवृत्त झालेल्या सौ. मोघे मॅडम तसेच सौ. गोपाळ मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.