( संगमेश्वर / प्रतिनिधी )
प्रा. डॉ. वासंती जोशी स्मृतिप्रित्यर्थ ‘स्मृतिगंध’ या उपक्रमांतर्गत सह्याद्रि स्कूल ऑफ आर्ट, सावर्डे आणि कल्पवृक्ष आर्ट गॅलरी – ग्वालियर यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार, दि. १९ नोव्हेंबर २०२५ रोजी जिल्हास्तरीय निसर्गचित्रण (प्रत्यक्ष निसर्गचित्रण) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ‘सावर्डे व परिसरात ही स्पर्धा घेण्यात आली.
या स्पर्धेचे उद्घाटन व पारितोषिक वितरण समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कोकणचे जेष्ठ चित्रकार- शिल्पकार व कलामहाविद्यालयाचे चेअरमन प्रा. प्रकाश राजेशिर्के,कोल्हापूरचे चित्रकार शिवाजी मस्के, कोल्हापूरचे सुलेखनकार राजेश हंकारे, सौ. पूजाताई निकम, अनिरुद्ध निकम, चित्रकार प्रविण मिसाळ हे देखील उपस्थित होते.
स्पर्धा रत्नागिरी जिल्ह्यातील कला विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आली तसेच या स्पर्धेसाठी प्रवेश फी ठेवलेली नव्हती. स्पर्धेची वेळ सकाळी ८.३० ते दुपारी १.३० अशी होती.यामध्ये विद्यार्थ्यांच्या नास्ता, जेवण तसेच संध्याकाळी चहा- पाणी व्यवस्था करण्यात आली. या स्पर्धेसाठी ७२ कलाविद्यार्थी सहभागी होते. त्यांनी ७५ चित्रे विविध माध्यमात रेखाटली.
या स्पर्धेत काढलेली अनुक्रमे ११ पारितोषिके काढण्यात आली. या मध्ये ३००० /- ची सात चित्रे पुढील प्रमाणे सार्थक आदवडे, मिताली कुलकर्णी,अमर राऊळ, शिवम नलावडे, प्रथमेश लिंगायत, श्रेयस सर्वेकर, अल्मा सोलकर, १००० /-ची उत्तेजनार्थ पारितोषिक पुढीलप्रमाणे. पंकज सुतार, आयुष कदम,सिद्धार्थ भोवड, सौरभ साठे या चित्रांचे प्रदर्शन व पारितोषिक वितरण सह्याद्रि स्कूल ऑफ आर्ट सावर्डे च्या कलादालनातन करण्यात आले व त्या ठिकाणी बक्षीस वितरण संपन्न झाले.

