(देवरूख / प्रतिनिधी)
प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्था आंबव संचलित कै. सौ. मीनाताई ठाकरे माध्यमिक विद्यालय, साडवली येथील विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. एकूण ३० विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत आपले स्थान मिळवत विद्यालयाचा लौकिक उज्ज्वल केला आहे.
या परीक्षेत विद्यालयातील कु. निषाद संदीप मोहिते याने संगमेश्वर तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला असून, जिल्हा पातळीवर द्वितीय क्रमांक मिळवून शालेय पातळीवरील यशाच्या शिखरावर पोहोचला आहे.
गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे –
निषाद संदीप मोहिते, माही गिरीश वनकर, निरंजन विनोद शिंदे, शार्दुल संदीप वाडेकर, रुद्र जयवंत घाणेकर, त्रिवेणी समीर सुवारे, आर्या महेश आग्रे, सिद्धी भिमराव पाटील, आर्या मधुकर वाजे, रुद्र दशरथ गवंडी, अद्विका विवेकानंद गायकर, सारंगी उमेश जाधव, दर्शन प्रकाश झोरे, राजनंदिनी कृष्णात जाधव, निनाद संदीप गोवरे, वेदांती प्रदीप राव, ऋतु कृष्णा करंजकर, मयुरेश रविंद्र गुरव, सार्थक महेंद्र शिंदे, अर्णव दीपक डोंगरे, श्रावणी सुधीर भिंगार्डे, अनुष्का सुरेश मिराशी, वैदेही महेंद्र भुवड, वेदांत विनायक वेले, आदिती जयंत भाटकर, आयुष मंगेश कदम, आर्यन केशर नर, गार्गी सचिन पवार, साई प्रमोद कांबळे आणि हेरंब निखिल भागवत.
या उल्लेखनीय यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक बी. व्ही. नलावडे सर, मार्गदर्शक शिक्षकवृंद आणि यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष मा. रवींद्र माने, उपाध्यक्ष मा. मनोहर सुर्वे, व कार्याध्यक्षा सौ. नेहा माने मॅडम यांनी विशेष अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.