( देवळे / प्रकाश चाळके )
कला संचालनालयातर्फे २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या रेखाकला परीक्षेत साखरपा येथील कबनूरकर स्कुलने मोठे यश संपादन केले आहे. परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला असून तीन विद्यार्थ्यांना ए ग्रेड मिळाली आहे.
एलिमेंटरी परीक्षेत एकूण ११ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी ऋचा पाटील आणि उमंग भिंगार्डे यांना ए ग्रेड मिळाली आहे. तर अनिशा बेटकर, गार्गी शिंदे, गौरीज बने, कौस्तुभ सकपाळ आणि नित्या सावंत यांना बी ग्रेड मिळाली. अन्य विद्यार्थी सी ग्रेडमध्ये उत्तीर्ण झाले.
एंटरमिजीट परीक्षेत १० विद्यार्थी बसले होते. त्यात गणेश मावेनूर ह्या विद्यार्थ्याने ए ग्रेड मिळवली असून प्रशांत शेडे आणि रुद्र कचरे यांना बी ग्रेड मिळाली असून अन्य विद्यार्थी सी ग्रेडमध्ये उत्तीर्ण झाले आहेत.
या सर्व विद्यार्थ्यांना कला शिक्षक विष्णू परीट सर यांनी मार्गदर्शन केले होते. विद्यार्थ्यांच्या ह्या यशाबद्दल त्यांचे तसेच मार्गदर्शक परीट सर यांचे संस्था चेअरमन श्रीधर कबनूरकर, मुख्याध्यापिका लीना कबनूरकर, उपमुख्याध्यापिका प्राजक्ता गद्रे, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

