(जाकादेवी / वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील वरवडे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ वरवडे संचलित माध्यमिक विद्यालय वरवडे भागशाळा व श्रीमती पार्वती शंकर बापट कनिष्ठ महाविद्यालय वाटद – खंडाळा येथे इयत्ता दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संस्थेच्या व शाळेच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. या
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र विचारे तर प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती शालिनी भार्गव कद्रेकर व त्यांच्या भगिनी शकुंतला कद्रेकर, नामांकित वकील ॲड.एस.एम. देसाई, श्री.मनोहर विचारे आणि सौ.सुकेशनी शशिकांत सावंत हे उपस्थित होते.
सर्वप्रथम श्रीमती शालिनी भार्गव कद्रेकर यांनी शाळेला दिलेल्या 10,00000/- (दहा लाख) रुपये निधीतून बांधण्यात आलेल्या वर्ग खोलीच्या भित्तीपत्रकाचे अनावरण करण्यात आले. त्यानंतर
मार्च २०२५ बोर्ड परीक्षेत इयत्ता दहावी मध्ये प्रथम आलेले तीन विद्यार्थी कु.आर्या संतोष बोरकर,कु.प्रणव रमेश बळकटे, कु.स्वरदा राम साठे तर वरवडे शाळेतून प्रथम आलेले तीन विद्यार्थी कु.आर्या संतोष बोरकर,कु.आर्या प्रवीण पावसकर, कु.वर्षा मनोज खापले तसेच इयत्ता बारावी विज्ञान शाखेमध्ये प्रथम आलेले तीन विद्यार्थी कु.तनिष्का रविकांत पवार कु.विशाल विठ्ठल मोरे,कु.वैष्णवी राजन पेडणेकर इयत्ता बारावी वाणिज्य शाखेमध्ये प्रथम आलेले तीन विद्यार्थी कु.शर्वरी प्रभाकर शिर्के,कु.चैतन्य रमेश जुवेकर,कु. अनिकेत गजानन जुवेकर या सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला व त्यांना बक्षीस वितरीत करण्यात आले.
याच कार्यक्रमादरम्यान चाफेरी गावचे सुपुत्र व सध्या अमेरिकेत स्थायिक असलेले व्यवसायिक श्री.सुशांत शशिकांत सावंत यांच्याकडून त्यांच्या आई सौ.सुकेशनी शशिकांत सावंत यांच्या हस्ते शाळेतील आर्थिकदृष्ट्या गरजू व होतकरू मुलांना स्कूल बॅग,वह्या व छत्री ह्या वस्तूंचे वाटप करण्यात आले. ऍडव्होकेट श्री.देसाई सर आणि शाळेचे मुख्याध्यापक श्री.शिवाजी जगताप सर यांनी आपल्या मनोगतातून गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सहा.शिक्षक श्री.प्रभाकर धोपट यांनी केले तर संस्थेचे कोषाध्यक्ष श्री.दिवाकर जोशी यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र विचारे,सचिव श्री.समीर बोरकर कोषाध्यक्ष श्री. दिवाकर जोशी, संस्थेचे संचालक श्री.संदीप सुर्वे शाळेचे मुख्याध्यापक,पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

