(गणपतीपुळे / वैभव पवार)
राज्याचे माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त तीर्थक्षेत्र गणपतीपुळे मंदिरात रविवारी अभिषेक करून त्यांना दीर्घायुष्य लाभो, अशी प्रार्थना शिवसैनिकांकडून करण्यात आली. श्रींच्या चरणी अभिषेक घालून आणि विशेष प्रार्थना अर्पण करून शिवसैनिकांनी यावेळी उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख राजेंद्र शिंदे, जिल्हा समन्वयक संजय पुनस्कर, उपतालुकाप्रमुख प्रकाश जाधव, विभागप्रमुख उत्तम मोरे, विभागीय संघटक प्रवीण साळवी, तालुका समन्वयक साईनाथ जाधव, युवासेना उपतालुकाप्रमुख रोहित साळवी, उपविभागप्रमुख गजानन गिडये, कळझोंडी शाखाप्रमुख शांताराम वीर, उपशाखाप्रमुख संतोष चौगुले, उपशाखाप्रमुख दशरथ साळवी, ग्रामपंचायत सदस्य नितीन दुर्गवळी, उपशाखाप्रमुख हरी शिवगण, उपशाखाप्रमुख प्रसाद पाटील, माजी उपसरपंच सुनील रेवाळे, शिव सहकार सेना विभाग प्रमुख नाथा मोरे, शाखाप्रमुख नेवरे प्रमोद भोसले, माजी सरपंच भगवती नगर वसंत फडकले, कार्यालय प्रमुख मालगुंड जगन सुर्वे, जयवंत सावंत आदी मान्यवर आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवसैनिकांनी या निमित्ताने उद्धव ठाकरे यांना दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि पुढील राजकीय वाटचालीसाठी मंगलमय शुभेच्छा दिल्या.