(मीरा-भाईंदर)
मराठी अस्मितेसाठी आयोजित करण्यात येणाऱ्या सर्वपक्षीय मोर्च्यापूर्वीच मोठी पोलिस कारवाई करण्यात आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे–पालघर विभागप्रमुख अविनाश जाधव यांना मध्यरात्री ३ वाजता पोलिसांनी त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले.
हा मोर्चा अमराठी व्यापाऱ्यांनी काढलेल्या मोर्च्याला उत्तर म्हणून आयोजित करण्यात येणार होता. मंगळवारी सकाळी मीरा-भाईंदरमध्ये हा मोर्चा होणार होता. मात्र, त्याआधीच पोलिसांनी खबरदारीच्या उपाययोजनांचा एक भाग म्हणून जाधव यांच्यासह मनसे आणि इतर राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
या कारवाईमुळे परिसरात राजकीय वातावरण तापले असून, मराठी पक्षांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे. पोलिसांनी कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी हे पाऊल उचलल्याचे सांगितले आहे.

