जपान आणि फिलिपीन्सदरम्यान समुद्राखालील भेगांमुळे भूकंप व त्सुनामी येणार असल्याची भविष्यवाणी कलाकार रियो तात्सुकी, ज्यांना अनेक जण “न्यू बाबा वेंगा” म्हणून ओळखतात, यांनी केली आहे. त्यांच्या या भविष्यवाणीनंतर जपानमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून नागरिक चिंतेत आहेत. या घबराटीमुळे सरकारसमोर जनतेच्या मनातील भीती दूर करण्याचं मोठं आव्हान उभं राहिलं आहे.
५ जुलै २०२५ रोजी जपानमध्ये विनाशकारी त्सुनामी येणार असल्याचा दावा न्यू बाबा वेंगांनी केला आहे. या इशाऱ्याचा पर्यटन क्षेत्रावरही मोठा परिणाम झाला आहे. जपानमध्ये येणाऱ्या अनेक पर्यटकांनी आपल्या सहली रद्द केल्या आहेत.
‘द गार्जियन’च्या अहवालानुसार, जपान आणि फिलीपिन्सदरम्यान समुद्राखालील ताणामुळे त्सुनामी येण्याची शक्यता असल्याचं अनेकांनी मान्य केलं आहे. या दाव्यामुळे जपानमध्ये फ्लाईट बुकिंगमध्ये तब्बल ८३ टक्के घट झाली आहे. विशेषतः पूर्व आशियातील अनेक प्रवाशांनी संभाव्य आपत्तीच्या भीतीने आपले प्रवास रद्द केले आहेत. हॉंगकॉंगहून होणाऱ्या बुकिंगमध्येही ५० टक्क्यांची घट नोंदवण्यात आली आहे.

