(मुंबई)
राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे यावर्षी प्रथमच राज्यभर राबवण्यात आलेल्या अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत सुमारे १० लाख ६६ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. मात्र, यामधून फक्त ५० टक्के विद्यार्थ्यांनाच पहिल्या फेरीत प्रवेश मिळाला आहे, त्यामुळे उर्वरित विद्यार्थ्यांचा प्रवेश आणि वर्ग कधी सुरू होणार, हा प्रश्न विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये निर्माण झाला आहे.
दरम्यान, शिक्षण विभागाने अकरावीच्या दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार १० जुलैपासून १३ जुलैपर्यंत विद्यार्थ्यांना पसंतीक्रम नोंदवता येणार आहे.
प्रवेश प्रक्रियेची आकडेवारी :
-
अर्जदार विद्यार्थी : १०,६६,०००
-
प्रवेशासाठी एकूण जागा : २१,३१,७२०
-
प्रवेश घेतलेले विद्यार्थी (७ जुलैपर्यंत) : ५,०८,०९६
-
CAP Round-I मधून प्रवेश घेतलेले : ४,३२,२८४
-
एकूण महाविद्यालये : ९,४६६
-
रिक्त जागा (पहिल्या फेरीनंतर) : १५,१५,६२८

दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक :
-
पसंतीक्रम नोंदणी : १० जुलै ते १३ जुलै
-
गुणवत्तानुसार गुणवत्ता यादी जाहीर : १७ जुलै
-
प्रवेशासाठी महाविद्यालयात हजर राहण्याची मुदत : १८ जुलै ते २१ जुलै
-
तिसऱ्या फेरीसाठी रिक्त जागांची यादी : २३ जुलै
शालेय शिक्षण विभागाने सर्व विद्यार्थ्यांना आवाहन केले आहे की त्यांनी वेळापत्रकानुसार आपला पसंतीक्रम भरावा आणि वेळेवर महाविद्यालयात हजर राहून प्रवेश प्रक्रियेत सहभागी व्हावे. रिक्त जागांच्या संख्येवरून स्पष्ट होते की अजूनही लाखो विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी आहे.

