( रत्नागिरी )
मराठी विज्ञान परिषद, रत्नागिरी विभागाच्या वतीने विज्ञान लेखनाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि विज्ञानविषयक विचार मराठीतून व्यक्त करण्यास उत्तेजन देण्याच्या उद्देशाने राज्यस्तरीय विज्ञान निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
या स्पर्धेत विद्यार्थी गटासाठी (इयत्ता बारावीपर्यंत) – ‘मोबाइलपासून मैदानाकडे’ हा विषय, तर खुल्या गटासाठी – ‘देहदान आणि अवयवदान’ हा विषय देण्यात आला आहे. स्पर्धकांनी १५०० ते २००० शब्दांतील निबंध ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत पाठवावेत.
मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्पर्धकांनी आपले निबंध पुढील पत्त्यावर पाठवावेत:
डॉ. विराज चाबके, कोषाध्यक्ष, मराठी विज्ञान परिषद, रत्नागिरी विभाग, वनस्पतीशास्त्र विभाग, गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त), रत्नागिरी – ४१५६१२.
ही स्पर्धा विनाशुल्क असून विभागीय स्तरावरील विजेत्यांना पारितोषिके देण्यात येणार आहेत. अधिक माहितीसाठी डॉ. उमेश संकपाळ, कार्यवाह, मराठी विज्ञान परिषद, रत्नागिरी विभाग, (रसायनशास्त्र विभाग, गोगटे जोगळेकर महाविद्यालय) यांच्याशी संपर्क साधावा.
http://mavipa.org किंवा https://gjcrtn.ac.in या संकेतस्थळांवर स्पर्धेची सविस्तर माहिती उपलब्ध आहे.
या स्पर्धेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी व विज्ञानप्रेमींनी सहभाग घ्यावा, असे आवाहन गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी केले आहे.

