(जाकादेवी / संतोष पवार)
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या जाकादेवी येथील तात्यासाहेब मुळये माध्यमिक विद्यालय व बाबाराव पर्शराम कदम कनिष्ठ महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा व मार्गदर्शक शिक्षकांचा शिक्षण संस्थेचे खजिनदार संदीप बाबाराम कदम परिवार यांच्या वतीने इ.१० वी, १२ वी बोर्ड परीक्षेत अनुक्रमे तीन गुणवंत विद्यार्थ्यांना रोख रक्कम व भव्य पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
सदरचा कार्यक्रम शिक्षण संस्थेचे धडाडीचे चेअरमन सुनिल उर्फ बंधू मयेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष संदीप कदम, सचिव विनायक राऊत, सहसचिव श्रीकांत मेहंदळे, संचालक व जाकादेवी विद्यालय विद्यालयाचे सी.ई.ओ. किशोर पाटील, संचालक रोहित मयेकर, संचालक परेश हळदणकर, निमंत्रित संचालक विलास राणे, ॲड विनय आंबुलकर, ॲड.सौ. शाल्मली आंबुलकर, सौ. श्रावणी संदीप कदम, सोनाली हटकर, प्रशालेचे मुख्याध्यापक नितीन मोरे, पर्यवेक्षक शाम महाकाळ, सांस्कृतिक विभागाचे प्रमुख संतोष पवार, ज्येष्ठ शिक्षक अरुण कांबळे, अमित बोले महेश राडे, संदेश सोनवडकर यांसह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी, गुणवंत विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते.
सदरचा विद्यार्थी व शिक्षक गुणगौरव शिक्षण संस्थेचे माजी खजिनदार, थोर देणगीदार,कै. बाबाराम पर्शराम कदम यांच्या जयंतीचे औचित्य साधून करण्यात आला. प्रारंभी बाबाराम पर्शराम कदम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना व मार्गदर्शक सर्व शिक्षकांना रोख रक्कम व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी अस्मिता मायंगडे, सानिका बळकटे या विद्यार्थ्यांनी तसेच पालक प्रतिनिधी विलास धामणे इत्यादींनी शाळेच्या गुणवत्तिविषयी कौतुक करून शाळा व संस्थेविषयी कृतज्ञता व्यक्त केली.जाकादेवी कनिष्ठ महाविद्यालयात सी.ई.टी.चे जादा वर्ग घेतले जातात. यावर्षी सी.ई.टी. परीक्षेत विशेष गुणवत्ता संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचाही गुणगौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक मुख्याध्यापक नितीन मोरे यांनी सूत्रसंचलन संतोष पवार यांनी तर आभार पर्यवेक्षक शाम हाकाळ यांनी मानले.