(राजापूर)
सोलगाव (ता. राजापूर) येथील श्री. महिपत शिवराम कदम (वय ६४) हे दिनांक ४ जानेवारी २०२६ रोजी सकाळी सुमारे ७ वाजता गगनगिरी मठ येथे गेले असता बेपत्ता झाले आहेत. त्यानंतर त्यांचा कोणताही संपर्क झालेला नाही.
या घटनेमुळे कुटुंबीय आणि ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. संबंधित व्यक्तीबाबत कोणाला काही माहिती मिळाल्यास तात्काळ खालील क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
संपर्कासाठी:
अजय कदम – ९७६९३७१६४५
सिद्धार्थ जाधव – ८८५०१८२५१८
नापत्ता व्यक्तीचे वर्णन –
वय सुमारे 64 वर्षे, उंची सुमारे 5 फुट 2 इंच
बांधा – साधारण, वर्ण – सावळा.
केस काळे पांढरे मिश्र, डोक्यावर टक्कल, साधारण दाढी (पांढरी)
अंगात – सफेद रंगाचे टी शर्ट,
खाली – साधारण पिवळसर रंगाची हाफ बरमोडा
पायात – चप्पल काळ्या रंगाची
नापत्ता व्यक्तीला चालताना थोडा त्रास होतो. त्यांच्या जवळ मोबाईल असून मोबाईल नंबर 8657003753 आहे.
सदर माहिती अधिकाधिक व्हॉट्सॲप गट, सामाजिक माध्यमे आणि परिचितांपर्यंत पोहोचवावी, जेणेकरून बेपत्ता व्यक्तीचा शोध घेण्यासाठी मदत होऊ शकेल, असे कुटुंबीयांकडून आवाहन करण्यात आले आहे.

