(दापोली)
ज्ञानदीप दापोली व ब्रिलीयन्ट इन्स्टिट्यूट दापोली यांचे संयुक्त विद्यमाने संतोषभाई मेहता वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी MHT CET 2025 परीक्षेमध्ये उज्ज्वल यश संपादित केले आहे.
यामध्ये श्रावणी पवार 96.53% tile, हाफसा काझी 95.84% tile, तनुजा जालगावकर 94.29% tile, अरफान मुकादम 93.98% tile यांनी दमदार यश संपदान करुन पुढील शैक्षणिक वाटचाल करण्यासाठी उज्ज्वल यश मिळविले आहे. यासाठी ज्ञानदीप शिक्षण संस्था दापोलीचे सेक्रेटरी सुजय मेहता व सर्व संस्था पदाधिकारी व ब्रिलीयन्टचे डॉ.अजित भोसले, झिशान अलीसर, कविता दुबे, अनुज अग्रवाल, जमशेद सर पटेल सर यांनी अधिक मेहनत घेतली.
दापोली शहरात राहून चांगले शिक्षण घेऊ शकतो. हे सिद्ध करुन दाखवून दिले आहे. त्यामुळे नक्कीच ज्ञानदीप दापोली संस्थेमार्फत दर्जेदार गुणवत्ता व नवे शैक्षणिक पर्व सुरु केले आहे. यासाठी दापोली शहरातून व ग्रामीण भागातून अभिनंदन व कौतुकाचा वर्षांव होत आहे. Repeater NEET परीक्षा 2025-26 चे वर्ग सुरु करण्यात आले आहेत. तरी इच्छुकांनी संपर्क करावा. असे आवाहन करण्यात आले आहे.