(खेड)
मुंबई-गोवा महामार्गावरील बोरघर गावाजवळ रविवारी सकाळी सुमारे ९ वाजता भरधाव कारचा वेग नियंत्रणाबाहेर जाऊन वाहन रस्त्यावर पलटी झाल्याची भीषण घटना घडली. या अपघातात चार प्रवासी जखमी झाले असून, त्यापैकी एका महिलेला गंभीर दुखापत झाली आहे.
एम.एच. ०१४ एल.पी. ३१६४ क्रमांकाची हुंडाई ऑरा कार मुंबईहून संगमेश्वरकडे जात असताना चालकाचे अचानक वाहनावरील नियंत्रण सुटले. परिणामी कार उलटून रस्त्याच्या मध्यभागी पलटी झाली. अपघातात गाडीतील चारही प्रवासी जखमी झाले आहेत.
अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी तत्काळ मदतकार्य सुरू करून जखमींना कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. जखमींची नावे समजू शकली नाहीत. खेड पोलीस अधिक तपास करत आहेत.

