(राजापूर)
पडवणेवाडी (ता. राजापूर) येथील तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका ८९ वर्षीय वृद्ध महिलेचा मृतदेह मुरकुंडा परिसरात आढळून आला आहे. शशिकला कृष्णा आंबोळकर (वय ८९, रा. नाटे पडवणेवाडी) असे मृत महिलेचे नाव आहे. ही दुर्दैवी घटना बुधवारी (दि. ५) सकाळी साडेअकराच्या सुमारास पडवणेवाडी–मुरकुंडा परिसरातील एका कलमाच्या (बांबूच्या) खड्यात आढळून आली.
शशिकला आंबोळकर या १ जून रोजी सकाळी साडेनऊ वाजता आपल्या राहत्या घरातून बाहेर पडल्या, मात्र त्या परत न आल्याने नातेवाईकांनी त्यांचा परिसरात शोध घेतला. नंतर नाटे पोलिस ठाण्यात त्यांच्या बेपत्ताबाबत तक्रार दाखल करण्यात आली होती. बुधवारी त्यांचा नातेवाईक प्रकाश आंबोळकर शोध घेत असताना मुरकुंडा परिसरातील एका लहानशा खड्यात त्यांचा मृतदेह आढळून आला.
या प्रकरणी नाटे सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, अधिक तपास सुरू आहे.