(राजापूर / तुषार पाचलकर)
राजापूर तालुक्यातील प्रवाशांसाठी होळी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर दिलासादायक बातमी आहे. आमदार सदाभाऊ खोत यांनी परिवहन मंत्री प्रताप नाईक यांच्याकडे केलेल्या पत्रव्यवहारानुसार आणि त्यांनी दिलेल्या सूचनेनुसार राजापूर आगाराच्या वतीने विशेष एसटी बस सेवा सुरू करण्यात येत आहे.
ग्रामपंचायत पाचल, राजापूर तालुक्यातील अखंड वारकरी संप्रदाय (पाचल पूर्व विभाग), व्यापारी संघटना पाचल, एसटी प्रेमी तसेच विविध सामाजिक संघटनांनी अजिवली–कल्याण–डोंबिवली–विठ्ठलवाडी या मार्गावर थेट बस सेवेची सातत्याने मागणी केली होती. या मागणीची दखल घेत राजापूर आगाराने होळी उत्सवानिमित्त ही विशेष सेवा जाहीर केली आहे.
ही बस सेवा आज दि. 28 फेब्रुवारी 2026 पासून सुरू होणार असून, प्रवाशांच्या सोयीसाठी वेळापत्रक पुढीलप्रमाणे ठेवण्यात आले आहे.
जाण्याचा प्रवास
सायं. 3.30 वा. राजापूर → अजिवली
सायं. 6.00 वा. अजिवली → पाचल → लांजा → पाली → कल्याण → डोंबिवली → विठ्ठलवाडी
पोहोचण्याची अपेक्षित वेळ: सकाळी 6.00 वा.
परतीचा प्रवास
सायं. 7.00 वा. विठ्ठलवाडी → छत → कल्याण → डोंबिवली → पनवेल → चिपळूण → लांजा → पाचल → अजिवली
पोहोचण्याची अपेक्षित वेळ: सकाळी 7.00 वा.
या विशेष बस सेवेचा लाभ मुंबई महानगर परिसरात होळी साजरी करण्यासाठी जाणाऱ्या कोकणातील प्रवाशांना तसेच वारकरी, व्यापारी, नोकरदार व विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात होणार आहे. थेट मार्गावरील सेवा उपलब्ध झाल्याने प्रवासाचा वेळ, त्रास आणि अतिरिक्त खर्च कमी होणार असून सुरक्षित व सोयीस्कर प्रवास उपलब्ध होणार आहे.
प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा, वेळापत्रकाची माहिती घ्यावी करावे आणि गर्दीच्या काळात सहकार्य करावे, असे आवाहन राजापूर आगाराने केले आहे.

