(मुंबई)
उन्हाळी सुट्ट्यांमुळे वाढलेली प्रवासी गर्दी लक्षात घेऊन, मध्य रेल्वेने काही विशेष रेल्वेगाड्यांच्या सेवा कालावधीत वाढ केली आहे. यामुळे प्रवाशांना अधिक फेऱ्यांचा लाभ घेता येणार आहे.
लोकमान्य टिळक टर्मिनस – मडगाव विशेष गाडी
गाडी क्रमांक 01103 / 01104 ही साप्ताहिक विशेष सेवा आधी ५ मेपर्यंत नियोजित होती. त्यानंतर २६ मेपर्यंत चालवण्याची घोषणा झाली होती. आता या सेवेचा कालावधी ९ जूनपर्यंत वाढवण्यात आला आहे.
01103 लोकमान्य टिळक टर्मिनस – मडगाव दर सोमवारी
01104 मडगाव – लोकमान्य टिळक टर्मिनस दर रविवारी
ही गाडी ८ जूनपर्यंत चालवण्यात येणार आहे.
थांबे: करमाळी, थिवी, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी, राजापूर रोड, विलवडे, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पेण, पनवेल आणि ठाणे.
हडपसर – हिसार विशेष गाडी
गाडी क्रमांक 04726 (हडपसर – हिसार) आणि 04725 (हिसार – हडपसर) या साप्ताहिक विशेष गाड्यांचेही कालावधी वाढवण्यात आला आहे:
04726: दर सोमवारी – कालावधी ३० जूनपर्यंत
04725: दर रविवारी – कालावधी २९ जूनपर्यंत
या गाडीच्या पाच अतिरिक्त फेऱ्या धावतील.
थांबे: पुणे, चिंचवड, लोणावळा, कल्याण, वसई रोड, वापी, उधना, भरूच, वडोदरा, गोधरा, रतलाम, नागदा, कोटा, जयपूर, रिंगास, सीकर, नवलगड, झुन्झुनू, चिडावा, लोहारू, सादुलपूर आदी.
सूचना: या गाड्यांच्या वेळापत्रक, थांबे किंवा डब्यांच्या रचनेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. आरक्षण सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर तसेच IRCTC वेबसाइटवर उपलब्ध आहे. गाड्यांना विशेष शुल्क आकारले जाते.