(नाशिक / प्रतिनिधी)
नाशिक दौऱ्यावर आलेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस यांनी एका खासगी कार्यक्रमात परमपूज्य गुरुमाऊली श्री. आण्णासाहेब मोरे यांचा सन्मान करून शुभाशीर्वाद घेतले.
नाशिक मधील श्री साईबाबा हॉस्पिटलच्या उद्घाटन कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस व गुरुमाऊली श्री मोरे एकच व्यासपीठावर उपस्थित होते. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी गुरुमाऊलींचा सन्मान करून त्यांचे आशीर्वाद घेतले. तसेच सेवामार्गाच्या वतीने गुरुमाऊली यांनीही मुख्यमंत्री फडणवीस व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा सत्कार केला.
यावेळी खासदार शोभाताई बच्छाव, आमदार सीमाताई हिरे, आमदार हिरामण खोसकर हेही उपस्थित होते. रुग्णालयाच्या वतीने हृदयरोग तज्ज्ञ डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी व डॉ.पल्लवी धर्माधिकारी यांनीही परमपूज्य गुरुमाऊलींचा सन्मान करून त्यांचे आशीर्वाद घेतले.
रुग्णालयातील डॉक्टर आणि सेवक वर्गाकडून चांगली सेवा-शुश्रूषा घडावी आणि रुग्णालयात येणारे रुग्ण लवकरात लवकर बरे होऊन घरी जावेत अशा सदिच्छा गुरुमाऊलींनी दिल्या.