( दापोली )
गिम्हवणे (ता. दापोली) येथील रहिवासी आणि ए.जी. हायस्कूल, दापोलीचे माजी शिक्षक उदय गोविलकर (वय ७१) यांचे शुक्रवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने शिक्षण क्षेत्रात व समाजसेवेत कार्यरत असलेल्या एका ज्येष्ठ मार्गदर्शकाची उणीव निर्माण झाली आहे.
गोविलकर सर हे दापोली तालुक्यातील अनेक सामाजिक व शैक्षणिक संस्थांचे संस्थापक व अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी यशाचे शिखर गाठले आहे. ते फक्त शिक्षकच नव्हते, तर समाजहितासाठी झटणारे एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व होते.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, जावई, मुलगा, स्नुषा आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे.
त्यांची अंत्ययात्रा आज (शनिवार, ३१ मे रोजी) सकाळी त्यांच्या गिम्हवणे येथील राहत्या घरून निघणार आहे. त्यांच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली असून, अनेक माजी विद्यार्थी व सहकारी शिक्षकांकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.