(रत्नागिरी)
शैबाज उस्मान चिपळूणकर (चिपळूण, रत्नागिरी) यांच्या मालकीच्या स्मार्टनेट महाराष्ट्र संघाने भारत कप २०२५ मध्ये दमदार कामगिरी करत उपांत्यपूर्व सामना जिंकला असून आता संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. हा सामना आज, ३१ मे रोजी, रात्री ८ वाजता खेळवण्यात येणार आहे.
कर्णधार केतन महात्रे यांच्या कुशल नेतृत्वाखाली संघाने शिस्तबद्ध व प्रेरणादायी खेळ केला. विशेषतः कोकणचा दमदार खेळाडू दर्शन बांदेकरी याने अप्रतिम खेळ साकारत प्रेक्षकांची मने जिंकली आणि संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
या विजयामुळे रत्नागिरीचे युवा उद्योजक शैबाज चिपळूणकर महाराष्ट्रासाठी गौरवाची बाब ठरत आहेत. स्थानिक पातळीवरून राष्ट्रीय स्तरावर पोहोचलेल्या या संघाच्या कामगिरीकडे राज्यभरातून कौतुक केले जात आहे. या संघाने राज्याच्या प्रतिनिधीत्वाची जबाबदारी लिलया पार पाडली आहे. त्यांच्यातील चिकाटी, जिद्द आणि संघभावना उल्लेखनीय आहे.
📍 सामना थेट पाहा: Tennis Cricket YouTube चॅनेलवर
📅 तारीख: ३१ मे २०२५ | ⏰ वेळ: रात्री ८:०० वाजता
स्थानिक क्रीडाप्रेमींनी सांगितले, “स्मार्टनेट महाराष्ट्र संघ हे कोकणातील युवा खेळाडूंना प्रेरणा देणारे उदाहरण ठरले आहे. त्यांच्या खेळामुळे जिल्ह्याच्या नावाला राष्ट्रीय स्तरावर मान मिळतो आहे.”
स्मार्टनेट महाराष्ट्र संघाला उपांत्य फेरीसाठी जिल्ह्यातील अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत. भारत कप २०२५ स्पर्धेत उत्तम खेळ करत उपांत्य फेरीत दाखल झालेल्या स्मार्टनेट महाराष्ट्र संघाला रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक मान्यवर, क्रीडाप्रेमी आणि नागरिकांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.