(दापोली)
दापोली येथील अडखळ येथे दोन गटात जोरदार राडा झाला येत आहे. अडखळ तरीबंदर येथे बसण्याच्या जागेवरून आणि डंपर लावण्यावरून बुधवारी सायंकाळी दोन गटात जोरदार हाणामारी झाली.
अडखळमधील एका तरुणाने पार्किंगमध्ये लावलेल्या एका गाडीचा फोटो काढला, यावरून अडखळ मोहल्ला येथील एकाने हा फोटो का काढला अस विचारलं त्यानंतर एका बाजूने जोरदार दगडफेक झाली. यानंतर दुसऱ्या बाजूनेही दगडफेक केली गेली. हा जागेचा वाद असल्याचं बोललं जात आहे. सदर वाद डंपर लावण्याच्या प्रकरणावरून झाला असून यामुळे दोन गटात तुंबळ हाणामारी झाली आहे. हा राडा नंतर वाढत जाऊन यामध्ये दोन गटांकडून एकमेकांवर दगडफेक देखील करण्यात आली.
दरम्यान पाजपंढरी येथील जमाव मोठ्या प्रमाणात अडखळ मोहल्ला येथे जाऊन त्यांनी देखील दगडफेक केली आहे. या दगडफेकीमध्ये काहीजण जखमी देखील झाले आहेत. दोन्ही बाजूकडून मोठा जमाव देखील जमा झाल्याचे व्हिडीओ आता व्हायरल होऊ झाले आहेत.
अडखळ तरीबंदर येथे बसण्याच्या जागेवरून लोकांमध्ये या वादाला सुरुवात झाली .पाजपंढरी येथील जमाव मोठ्या प्रमाणात अडखळ मोहल्ला येथे घुसला त्यांनी मोहल्यावर दगड, काठ्या, लोखंडी शिगा यांनी मारा केला, यामध्ये काही जण जखमी झाले. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही गटांना नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र रात्रीपर्यंत परिसरात तणावाचे वातावरण होते. रात्री उशिरा आठ जखमींना दापोली उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले होते.