(खेड)
सामाजिक बांधिलकी जपत विघ्नहर्ता युवा प्रतिष्ठान (मुंबई-खेड-चिपळूण) या संस्थेच्या वतीने राज्य परिवहन महामंडळाच्या खेड आगार अंतर्गत सुरू असलेल्या (खेड – पन्हाळजे – खेड) आणि (खेड – चिपळूण – खेड) या मार्गांसाठी मार्गफलक भेट देण्यात आले. हे मार्गफलक खेड आगार व्यवस्थापक श्री. रणजित राजेशिर्के यांच्याकडे औपचारिकपणे सुपूर्त करण्यात आले.
या कार्यक्रमप्रसंगी खेड आगाराचे सहाय्यक कार्यशाळा अधिक्षक श्री. अक्षय निमुणकर, कोकण एसटी प्रेमी ग्रुप, महाराष्ट्र राज्य जनसंपर्क प्रमुख श्री. साहिल हुंबरे, साईतारा अधिकृत एस.टी. आरक्षण केंद्र, खेडचे मालक श्री. आकाश मोरे, तसेच विघ्नहर्ता युवा प्रतिष्ठानचे पदाधिकारी श्री. चंद्रकांत पवार उपस्थित होते. याशिवाय स्थानिक समाजबांधव श्री. राजेंद्र पवार, श्री. प्रकाश पवार आणि खेड आगारातील इतर अधिकारी व कर्मचारी यांचीही उपस्थिती लाभली.
या उपक्रमामुळे प्रवाशांना मार्गाविषयी अधिक स्पष्ट माहिती मिळणार असून, स्थानिक पातळीवरील सहभागातून सार्वजनिक सेवांमध्ये सकारात्मक बदल घडवण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे. विघ्नहर्ता युवा प्रतिष्ठानच्या या सामाजिक उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

