(खेड / वार्ताहर)
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, खेड शाखेच्या वतीने आयोजित विद्यार्थी व शिक्षक गुणगौरव सोहळा जोगळे बंधू मल्टीपर्पज हॉल, भरणे येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुकाध्यक्ष संतोष चव्हाण होते. कार्यक्रमाला समितीचे जिल्हाध्यक्ष दिलीप महाडिक, प्राथमिक शिक्षक पतपेढीचे चेअरमन सुनील दळवी, खेडचे गटशिक्षणाधिकारी संतोष भोसले, माजी चेअरमन सुनील सावंत, कोकण विभाग प्रमुख रुपेश जाधव, जिल्हा उपाध्यक्ष शरद भोसले, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख राजेश भागणे, माजी अध्यक्ष अजित भोसले, माजी उपाध्यक्ष संजय सुर्वे, मोहाने हायस्कूलचे मुख्याध्यापक धनंजय नायकल तसेच जिल्हा कार्यालय चिटणीस मुकुंद वाजे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
यावेळी शिष्यवृत्ती परीक्षा, नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा, बीडीएस, मंथन, दहावी, बारावी, जेईई, नीट तसेच पदवी व पदव्युत्तर शिक्षणात उल्लेखनीय यश संपादन केलेल्या शिक्षकांच्या पाल्यांसह सुमारे ३०० गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. तसेच आदर्श शाळा, आदर्श शिक्षक, कला व क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणारे शिक्षक, नूतन केंद्रप्रमुख आणि विविध क्षेत्रांत विशेष योगदान देणाऱ्या गुणवंत शिक्षकांचाही सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नरेश ठोंबरे यांनी केले. प्रास्ताविक तालुकाध्यक्ष संतोष चव्हाण यांनी केले, तर आभार प्रदर्शन सचिव धर्मपाल तांबे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अध्यक्ष संतोष चव्हाण, सचिव धर्मपाल तांबे, नवनीत घडशी, अनिल यादव, शैलेश पराडकर, दिलीप यादव, श्रीकृष्ण खांडेकर, तुकाराम काताळे, निलेश कांदेकर, नरेश ठोंबरे, संतोष यादव, संजय सुर्वे, सुनील पांगुळ, दिनेश पवार, प्रमोद कदम, भागोजी कडव, महेंद्र शिंदे, चंद्रकांत पवार, अनंत शिंदे, अजय साबळे, अशोक पाटील, विजय कासार, शशिकांत भुवड, नारायण शिरकर, बबन मोरे, अनिल आंजर्लेकर, कृष्णा पवार, गजानन पालांडे, सुरसिंग ठाकरे, राजाराम दरेकर, सचिन गावडे, भरत बोडके, सतीश गजमल, अनंत मोरे, सुनील जंगम, रोहन देवकते तसेच दीक्षिता तांबे, सुविधा सावंत, दीप्ती यादव, स्नेहल बामणे, अंकिता भोसले, सरला मावळी, शर्वरी भोसले, किरण जानकर, रश्मी कोलगे, ऋतुजा तांदळे, विधी बने, दीपाली पालवे, सुजाता चाळके, रसिका रेवाळे, अनुराधा शिंदे, पूजा भावे, रश्मी पालांडे, कल्याणी कासार, सुनिता तांदळे पाटकर, मंगल थोरात आदींनी परिश्रम घेतले.

