(संगमेश्वर / प्रतिनिधी)
संगमेश्वर तालुक्यातील कडवई येथे मैत्री सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत ‘दोस्ती यारी माळवाशी’ संघाने अंतिम फेरीत जोरदार कामगिरी करत विजेतेपदावर आपले नाव कोरले. चुरशीच्या अंतिम सामन्यात या संघाने ‘नवयुवक खरशेत बाटलेवाडी’ संघावर अवघ्या एका गुणाने विजय मिळवत सर्वांची दाद मिळवली.
संगमेश्वर तालुक्यातील १६ नामवंत संघांनी दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेत सहभाग घेतला होता. स्थानिक संघ ‘मैत्री कडवई’ने तृतीय क्रमांक पटकावला तर ‘नाचरेवाडी आरवली’ संघाने चतुर्थ क्रमांकावर समाधान मानले. स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू म्हणून ‘माळवाशी’ संघाच्या रोशन कांबळे याने बाजी मारली. तर ‘बेस्ट रेडर’ म्हणून ‘बाटलेवाडी’ संघाचा अचल बाटले आणि ‘बेस्ट डिफेंडर’ म्हणून माळवाशी संघाचा दिनेश कांबळे यांची निवड झाली.
या स्पर्धेला सहदेव बेटकर, संतोष थेराडे, चंद्रकांत जाधव, दत्ताराम ओकटे, दत्ताशेठ लाखण, अरविंद जाधव, निलेश कुंभार, डॉ. भगवान नारकर, प्रदीप कानाल, राज बोथरे, प्रमोद कडवईकर आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली. तसेच पत्रकार संघाचे मुजीब खान, वहाब दळवी, नियाज खान, दीपक तुळसणकर यांचीही उपस्थिती नोंदवण्यात आली.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संयोजकांच्या मेहनतीबरोबरच सहदेव बेटकर, संतोष थेराडे, प्रशांत यादव, सुधीर सुर्वे, अरविंद जाधव, चंद्रकांत जाधव, दी एज्युकेशन सोसायटी, कडवई आणि इतर अनेकांनी मोलाचे सहकार्य केले. अध्यक्ष महेश जाधव, सचिव मिलिंद कडवईकर आणि खजिनदार मोहित पंडव यांच्या मार्गदर्शनाखाली कल्पेश माने, महेश साळुंके, केतन ओकटे, रुपेश दहिवळकर, विकास धामणाक, सुनील पाचकुडे, सर्वेश सुर्वे, आकाश पाले, दीप्तेश जोशी, यश भडवळकर, आयुष भडवळकर, यश गुरव, राजू चांदे, मंजुश्री कडवईकर, पारस बाईत आणि साईराज सुर्वे या कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली.
संपूर्ण स्पर्धेचे संयोजन आणि सूत्रसंचालन सुनील शिगवण यांनी समर्थपणे सांभाळले. पंच म्हणून ओंकार पातेरे, मनीष बांडागळे, ओंकार वासकर यांनी जबाबदारी निभावली तर वेळाधिकारी म्हणून संतोष फुटक यांनी अचूक नियोजन केले.