(देवळे / प्रकाश चाळके)
संगमेश्वर तालुक्यातील देवळे येथील चंद्रकांत (दादा) राजाराम गुरव यांचे वयाच्या ६९व्या वर्षी बुधवारी, दिनांक ७ रोजी त्यांच्या देवळे येथील निवासस्थानी निधन झाले. त्यांच्या निधनाने देवळे परिसरात शोककळा पसरली आहे.
चंद्रकांत दादा गुरव हे शांत, संयमी आणि मनमिळावू स्वभावाचे व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित होते. ते सर्वांशी आपुलकीने संवाद साधत तसेच प्रेमाने हाक मारत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल विशेष जिव्हाळा होता. त्यामुळे ते सर्वांचे आवडते होते.
चंद्रकांत गुरव यांनी काही काळ मुंबईत नोकरी केली होती. मात्र, तब्येतीच्या किरकोळ कारणामुळे त्यांनी पुन्हा आपल्या गावी परतण्याचा निर्णय घेतला. देवळे येथील श्री खडगेश्वर मंदिरात त्यांनी काही काळ पूजा-अर्चेचे काम केले. तसेच चाफवली येथील चाफनाथ मंदिरातही त्यांनी पूजेचे काम केले.
त्यांच्या निधनाने देवळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, त्यांच्या परिचित व आप्तेष्टांकडून दुःख व्यक्त केले जात आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुली, भाऊ तसेच इतर सदस्य असा मोठा एकत्र कुटुंबीय परिवार आहे.


