(जळगाव)
काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा प्रतिशोध घेत भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत दहशतवाद्यांची नऊ ठिकाणे उद्ध्वस्त केली. यानंतर सीमेलगत पाकिस्तानने बेछूट गोळीबार सुरू केला असून भारत-पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे. परिणामी, भारतीय लष्कराने सर्व जवानांच्या सुट्ट्या रद्द करून तात्काळ सेवेत हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
या पार्श्वभूमीवर, जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील मनोज पाटील हे नुकतेच विवाहबंधनात अडकले होते. ५ मे रोजी नाचणखेडे येथील यामिनी पाटील सोबत त्यांचा विवाह झाला. मात्र, लग्नाच्या केवळ तिसऱ्याच दिवशी त्यांना देशसेवेच्या आदेशाने पुन्हा कर्तव्यावर हजर व्हावे लागले.
हळदीचा रंग आणि मेहंदीचा सुगंध अजूनही ओलाच होता, तेवढ्यात मनोज पाटील देशाच्या रक्षणासाठी निघाले. नवविवाहित यामिनीने या प्रसंगी अतिशय भावनिक प्रतिक्रिया देताना म्हटले, “ऑपरेशन सिंदूरसाठी माझं कुंकू पाठवतेय.” मनोज पाटील यांची ही देशभक्ती सध्या सोशल मीडियावर आणि स्थानिकांमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे. लग्नासाठी सुटी घेऊन मनोज गावी आलेले पाचोरा येथे लग्न सामारंभ आटोपत नाही, तोच मनोज यांस कर्तव्याच्या ठिकाणी त्वरित बोलावणं आलं.
जळगाव जिल्ह्यात पाचोरा तालुक्यातील मनोज पाटील देशसेवेच्या कार्यासाठी भारतीय सैन्यात भरती झाले. 5 मे रोजी मनोज पाटील यांचं लग्न झालं. लग्नाला दोन दिवस उलटत नाहीत, तोवर भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर सर्व जवानांच्या सुट्ट्या रद्द करुन त्यांना तात्काळ ऑन ड्युटी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. पाच तारखेला लग्न झाल्यानंतर दोन दिवसांत मनोज पाटील देशसेवेसाठी तात्काळ ड्युटीवर रवाना झाले. अंगावरची हळद ओली असतानाच हातावर रंगलेल्या मेहंदीसह मनोज पाटील देशाच्या रक्षणासाठी तैनात झालेत. दरम्यान, लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी कर्तव्यावर हजर झाल्यामुळे मनोज पाटील सध्या चर्चेत आहेत. लग्नाच्या आनंदात देखील देशसेवेचे व्रत पाळणाऱ्या या जोडप्याला संपूर्ण देश सलाम करत आहे.