(दापोली)
दिनांक ३ मे २०२५ रोजी दुपारी सव्वा वाजण्याच्या सुमारास, पियागो कंपनीची चारचाकी (क्रमांक MH-06-BW-4246) रस्त्यावर चुकीच्या पद्धतीने उभी करून ठेवल्याप्रकरणी संबंधित वाहनचालकाविरोधात दापोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उपजिल्हा रुग्णालय, दापोली समोरील मुख्य रस्त्यावर सदर चारचाकी गाडी अल्ताफ शरफुद्दिन लोगडे (वय ५३, रा. खोंडा, ता. दापोली, जि. रत्नागिरी) यांनी चुकीच्या व धोकादायक रीतीने उभी केली होती. या प्रकारामुळे दापोली-हर्णे मार्गावरील वाहतूक आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाला. वाहन उभे करून चालक त्या ठिकाणावरून अन्य ठिकाणी निघून गेला होता.
या प्रकरणी गुन्हा रजिस्टर क्र. ८३/२०२५ अन्वये भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम २८५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास दापोली पोलीस करत आहेत.