(दापोली)
क्रिडा व युवक सेवा संचालनालय पुणे व रत्नागिरी जिल्हा क्रिडा कार्यालय यांचे संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय मैदानी स्पर्धांना उत्साहात सुरुवात झाली आहे. या स्पर्धा कोकण कृषी विद्यापीठ दापोलीच्या मैदानावर आयोजित करण्यात आल्या आहेत. दापोली तालुकास्तरीय या मैदानी स्पर्धेचे उद्घाटन दापोली पंचायत समिती शिक्षण विभागाचे गटशिक्षण अधिकारी रामचंद्र सांगडे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.
यावेळी दापोली तालुका समन्वयक व बहुजन हिताय विद्यामंदिर आगरवायंगणी हायस्कूलचे मुख्याध्यापक सत्यवान दळवी यांच्या हस्ते गटशिक्षण अधिकारी रामचंद्र सांगडे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यानंतर तालुकास्तरीय स्पर्धाप्रमुख संदीप क्षीरसागर व बिपिन मोहिते यांना पुष्पगुच्छ देण्यात आले. त्याचबरोबर सर्व क्रीडा शिक्षक स्पर्धेतील खेळाडू यांना गटशिक्षण अधिकारी यांनी खेळाचे महत्व सांगून खेळाबद्दल उत्तम मार्गदर्शन करत पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

