(मुंबई)
महापारेषण कंपनीत नियमित मंजूर रिक्त पदांच्या जागेवर कार्यरत वीज कंत्राटी कामगारांना विविध पदांच्या भरती मध्ये जादा 10 मार्क व वयात 43 वर्षा पर्यंत शिथिलता मिळावी तसेच वायरमन ट्रेड च्या असलेल्या उमेदवारांना नोकरी करिता फॉर्म्स भरून त्यांना भारतीय संविधाना नुसार समान संधी उपलब्ध करावी. कांमगारांच्या वेतनावर डल्ला मारणाऱ्या कंत्राटदारांवर अंकुश ठेवावा, वेतन व फरक लवकर मिळावे या विषयांसाठी महापारेषण कंपनी प्रशासना विरोधात भारतीय मजदूर संघाच्या वीज कंत्राटी कामगार संघाने कामगार दिनाच्या दिवशी आंदोलन पुकारले होते.
पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांचा कार्यक्रम बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स परिसरातच असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी संघटनेला विनंती केल्याने हे आंदोलन तात्पुरते स्थगित केले. मुंबई पोलीस उप आयुक्त श्री.मनीष कलवानिया यांनी लवकरच ना.ऊर्जामंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या सोबत वीज कंत्राटी कामगार संघाच्या शिष्टमंडळासोबत चर्चा घडवून आणली जाईल असे आश्वासन दिले असल्याचे महामंत्री सचिन मेंगाळे यांनी सांगितले.
सचिन मेंगाळे आणि शुभम राठोड यांचे शिष्टमंडळ महापारेषणचे संचालक मानव संसाधन सुगतजी गमरे व मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी भरतजी पाटील यांच्या सोबत चर्चा झाली कंत्राटी कामगारांना वयात सवलत दिली जाईल तसेच वायरमन ट्रेड उमेदवारांचा विचार करणार असल्याचे गमरे म्हणाले.
संघटनेचे अध्यक्ष निलेश खरात यांच्यावर पुणे पोलिसांनी स्थानबद्धतेची कारवाई केल्याने ते मुंबईला येऊ शकले नसल्याचे संघाचे उपमहामंत्री राहुल बोडके यांनी कळवले. उमाकांत गिरी, नंदन राऊत, सुधीर शिर्के, विजय पडवळ, रोहित तांडेल, सुधीर शिवकर, कल्पेश म्हात्रे संदीप गायकवाड इत्यादी प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते